बीड : प्रसिद्ध साहित्यिक आणि प्राध्यापक श्रावण गिरी यांचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. बीड शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल रात्री अपघात झाला. ट्रॅव्हल्स धडकेत श्रावण गिरी यांचा जागीच मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोजच रात्री बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या रहदारीमुळे इतरांना मोठी अडचण होते. बसेसमुळे या भागात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होते. त्याचबरोबर बेस्ट रिक्षावाल्यांमुळे नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. यातील ७० टक्के रिक्षा विनापरवाना असल्याचा आरोप केला जात असून अनेक वेळा रिक्षा चालक संघटनेने पोलिसांना याची माहिती देऊनही रिक्षा चालक रात्री बेधुंद अवस्थेत रिक्षा पळवतात. यातून याआधी देखील छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

प्रेयसीची हत्या करुन मृतदेह आंबोली घाटात टाकला, प्रियकराचा मित्र म्हणतो, मी तर फक्त त्याच्या…
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले साहित्यिक आणि पेशाने प्राध्यापक श्रावण गिरी हे संभाजीनगर बीडला आले होते. त्यांना कर्जत येथे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जायचं होतं. यावेळेस बीडच्या सपना ट्रॅव्हल्सने त्यांना धडक देत खाली पाडले. त्यानंतरही ट्रॅव्हल्स न थांबता त्यांच्या पायावरुन गेल्याने अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यावेळेस तात्काळ आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

आई गेल्यावरही बाबा खंबीर होते, पण… सुधीर मोरेंची आत्महत्या, निकटवर्तीय महिलेवर गुन्हा
याला जबाबदार कोण ट्रॅव्हल्सवाले, पोलीस की बेधुंद अवस्थेत रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणारे असा सवाल विचारला जात आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते साठे चौक ते बीड शहरात अनेक रिक्षा चालक बरेचदा छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण देताना पाहायला मिळतात. यात नेहमीच वादही होताना पाहायला मिळतो. मात्र तरी देखील पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जातो.

वाढते अपघात, ओव्हरलोड गाड्या; भर बैठकीत आमदारांकडून अधिकाऱ्याची खरडपट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here