मुंबई: नौदलाच्या बेपत्ता स्टूअर्डचा शोध मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. नौदल कर्मचारी दानेश्वर साहू बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. फोर्टमधील आयएनएस साहूची नेमणूक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२६ वर्षीय साहूची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे तो कुलाब्यातील आयएनएस अश्विनी रुग्णालयात १९ जुलैला उपचारांसाठी दाखल झाला. त्याला २१ ऑगस्टला डिस्चार्ज मिळाला. पण तो कामावर रुजू झाला नाही. त्यानंतर नौदल प्रशासनानं याची माहिती छत्तीसगडच्या रामपूरमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाला दिली.
तुझ्यासाठी धर्मही बदलायचा विचार, पण तू…; आयुष्य संपवण्याआधी तरुणीनं लिहिलेली चिठ्ठी समोर
यानंतर साहूचे काका विष्णू प्रसाद मुंबईत आले. २८ ऑगस्टला त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात साहू बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. याबद्दल नौदल आणि साहूच्या कुटुंबाकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून कोणतीही खात्रीशीर माहिती मिळाली नाही.

नौदलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल प्रशासनानं घटनेची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून शोध सुरू आहे. दानेश्वर साहू गेल्या दोन वर्षांपासून आयएनएस स्टूअर्ड म्हणून कार्यरत आहे. नौदलाच्या कुलाबा तळावरच तो वास्तव्यास होता. त्याला रक्ताचा संसर्ग झाला. त्यामुळे महिनाभर त्यानं उपचार घेतले. दोन दिवस आराम करुन कामावर रुजू होईन, असं डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यानं डॉक्टरांना सांगितलं होतं. त्यानंतर तो कुलाब्यातील नौदल तळावर असलेल्या घरी परतला आणि फोनवरुन आई आणि बहिणीशी संवाद साधला.
हायवेजवळ दिसली लोखंडी पेटी, कोणीतरी पेटवून दिलेली; उघडून पाहताच लोकांची बोबडी वळली
दानेश्वरनं २३ ऑगस्टला कर्तव्यावर रुजू होणं अपेक्षित होतं. पण तो कामावर आलेला नाही, अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांनी २४ ऑगस्टला साहूच्या वडिलांना फोनवरुन दिली. साहू घरी आला आहे का, येणार आहे का, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. साहूचा ठावठिकाणा सापडत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते ऐकून कुटुंबियांना जोरदार धक्का बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here