नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरू विद्यापीठात () झालेल्या हिंसाचारावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू लिटील मास्टर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देश संकटात आहे, असे गावसकर यांनी म्हटले आहे. लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.

देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आताच्याघडीला भारत कठीण काळातून जात आहे. या संकटातून आपण नक्की बाहेर पडू, अशी आशा गावसकर यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही भारतात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली होती. यातून देशवासीयांनी मार्ग काढला, असेही ते म्हणाले.

गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर जेएनयूमध्ये हिंसाचार उसळला. त्याच्या निषेधार्थ देशभरातील विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले.

देश संकटात आहे. देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शिक्षण घेणे, अभ्यासात रमणे महत्त्वाचे आहे. आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत, असेही गावसकर म्हणाले.

संकटातून देश बाहेर येईल, यावर माझा विश्वास आहे. अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यात याच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आपण एकजूट असू, तरच आपण पुढे जाऊ शकू. आपण सर्व सामान्य भारतीय आहोत. खेळ आपल्यालाच हीच भावना शिकवते, असे गावसकर यांनी नमूद केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here