जालना : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज जालन्याच्या अंबडमधील आंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. माझ्यापरीने शक्य तेवढी मदत करेन, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याप्रश्नी तोडगा काढेन, असं आश्वस्त करताना गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांसाठी आपला जीव पणाला लावू नका, अशी विनंतीही केली. यावेळी त्यांनी आक्रमक भाषण ठोकत लाठीहल्ला केलेल्या सरकारविरोधात आसूड ओढला. लाठीमार करणाऱ्यांना मराठवाड्यात पाऊल ठेऊ देऊ नका, असे सांगतानाच राजकारण करू नका म्हणणाऱ्या फडणवीसांवरही त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली.

राज ठाकरे आज सकाळीच आंदोलनस्थळी आले. त्यांनी जवळपास २० मिनिटे जरांगे पाटील यांच्याशी खासगीत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी बसलेल्या तरुणांना संबोधित केलं. मराठा आरक्षणाचे मोर्चे निघत होते तेव्हाही सरकार तुम्हाला आरक्षण देणार नाही, केवळ झुलवित ठेवण्याचं काम करतंय. नेत्यांच्या नादी लागू नका, असं सांगितलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाचा विषय वेगळा आणि आत्ता जरांगे पाटील यांनी समजावलेला विषय वेगळा आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, असं राज यांनी मराठा समाजबांधवांना आश्वस्त केलं. संयुक्त महाराष्ट्र होत असताना वर्षभरानंतर मराठवाडा संस्थान महाराष्ट्रात सामिल झालं. त्यावेळी आम्हाला निजामकालीन आरक्षण होतं. ते आरक्षण आम्हाला पुन्हा लागू करावं. मराठा समाजाला सरकरट कुणबी प्रमाणपत्रे देण्याची आमची मागणी आहे, असं मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर राज यांच्या विषय लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो, तसेच काही तज्ज्ञांशीही बोलतो असं सांगितलं.

बबनरावांना आसमान दाखवणारे पुतणे साजन पाचपुते शिवसेनेत, ठाकरेंचे हात बळकट करणार
लाठीमार करणाऱ्यांना मराठवाड्यात पाऊल ठेऊ द्यायचं नाही, राज ठाकरे कडाडले

जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. सत्तेत नसतांना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जात आहे. फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? अशी विचारणा करताना लाठीमार करणारे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना मराठवाड्यात पाऊल ठेऊ द्यायचं नाही, अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.

लाठीमारामुळे अजितदादा नाराज, सरकारी कार्यक्रमांना दोन दिवस गैरहजर, आज मराठा आरक्षणाच्या बैठकीला हजेरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here