मुंबई: एअर होस्टेसचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पवईमधील फ्लॅटमध्ये सापडला आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एअर होस्टेसच्या मारेकऱ्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.रविवारी रात्री (३ सप्टेंबर) मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला. तिचा गळा कापण्यात आला होता. तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती सोसायटीत पसरली आणि एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा पूर्ण करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.पवईतील मारवाह रोडवरील एन. जी. हाऊसिंग हाऊसिंग सोसायटीत एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. मृत तरुणीचं वय वर्षे आहे. तरुणी एअर होस्टेस असून ती सध्या प्रशिक्षण घेत होती, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. तरुणी फ्लॅटमध्ये केव्हापासून वास्तव्यास होती, तिची हत्या कोणी आणि का केली, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. तपासासाठी पोलिसांनी ४ पथकं तयार केली आहेत. मारेकऱ्यानं एअर होस्टेसचा गळा धारदार शस्त्रानं चिरल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. मृत तरुणी मूळची छत्तीसगडची रहिवासी असून एप्रिलमध्ये ती नोकरीनिमित्त मुंबईला आली होती. बहीण आणि तिच्या प्रियकरासोबत ती फ्लॅटमध्ये राहत होती. फ्लॅटमध्ये एकूण तिघे वास्तव्यास होते. पैकी दोघे आठ दिवसांपूर्वीच गावी गेले.तरुणीच्या घरगड्यानं तिची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. घरगडी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच घरगडी आणि तरुणीचा वाद झाला होता. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी घरगड्यानं तिचा खून केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. करताना तिनं प्रतिकार केला असावा. त्यामुळेच त्याला जखम झाली असावी, असं पोलिसांना वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here