नवी दिल्ली: चांद्रयान-३ त्याच्या लक्ष्यापेक्षा अधिकची कामगिरी करण्यात यशस्वी ठरलं आहे. प्रज्ञान रोव्हरनं चंद्राच्या पृष्ठभागाची इत्यंभूत माहिती इस्रोला पाठवली. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये आहे. तर दुसरीकडे विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर उडी मारली आहे. याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांना आधी कोणतीच माहिती दिली नव्हती. पण आता हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यानंतर इस्रोनं याबद्दलची माहिती दिली आहे.विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर उडी मारली. ४० सेंटिमीटरपर्यंत हवेत होतं. या दरम्यान त्यानं ३० ते ४० सेंटिमीटर अंतर कापलं. इस्रोनं ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. विक्रमनं पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केलं आहे. विक्रम लँडर त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या कामापेक्षा अधिक गोष्टी करत आहे. त्यानं उडी मारण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, अशी माहिती इस्रोनं ट्विट करुन दिली. इस्रोनं कमांड दिल्यानंतर विक्रमचं इंजिन सुरू झालं. त्यानंतर विक्रम रोव्हर ४० सेंटिमीटर हवेत उडालं. यानंतर त्यानं ३० ते ४० सेंटिमीटर अंतर कापत पुन्हा सॉफ्ट लँडिंग केलं. विक्रमनं केलेली कामगिरी भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. भविष्यात चंद्राच्या पृष्ठभागावरुन पुरावे आणण्यासाठी मोहीम आखली गेल्यास त्यात विक्रमनं आता केलेली कामगिरी मोलाची असेल. उडी मारण्याआधी विक्रम लँडरचे रॅम्प, पेलोड्स बंद करण्यात आले होते. विक्रमनं सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण करताच रॅम्प पुन्हा उघडण्यात आले. आता विक्रम लँडरचे सगळे भाग आणि यंत्र अतिशय व्यवस्थित काम करत आहेत. तर दुसरीकडे चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती इस्रोला देणारं चांद्रयान-३ चं प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये आहे. सूर्योदय झाल्यानंतर सौर उर्जेच्या मदतीनं प्रज्ञान पुन्हा त्याचं काम सुरू करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here