शिवमोगा : कर्नाटक राज्यातील शिवमोगामधील कन्नड भाषिक शिक्षिकेची शासकीय उर्दू शाळेतून बदली करण्यात आली आहे. वर्गात दंगा करणाऱ्या मुलांना शिस्तीचं पालन करा किंवा पाकिस्तानात जा असं म्हटल्याच्या कथित आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मंजुळा देवी यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. मंजुळा देवी या शिवमोगामधील जवळील गावात वास्तव्यास आहेत. काही पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

शिवमोगा गट विकास अधिकारी पी. नागराज यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सबंधित शिक्षिकेची बदली करण्यात आल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून चौकशी सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शिवमोगामधील टिपू नगरमधील उर्दू शाळेत ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. मंजुळा देवी या गेल्या १० वर्षांपासून कोणत्याही वादाशिवाय कन्नड शिकवण्याचं काम करतात.

शिक्षिकेनं आरोप नाकारले, अधिकाऱ्यांची माहिती

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजुळा देवी यांनी हे आरोप नाकारले असल्याची माहिती दिली. तर, देवी यांची बदली कुठं करण्यात आली हे मात्र सांगितलं नाही.

पाकिस्तानात जा म्हटल्याची कथित घटना ३० ऑगस्ट रोजी घडली आहे. मंजुळा देवी सहावीच्या वर्गात अध्यापन करत होत्या. त्यावेळी काही विद्यार्थी भांडत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचं पालन करा अन्यथा पाकिस्तानात जा असं सांगितल्याची तक्रार करण्यात आल्याची माहिती पी. नागराज यांनी दिली.
Maratha Protest: बळाचं वापर करण्याचं कारण नव्हतं, जखमी झालेल्यांची शासनाच्यावतीनं फडणवीसांकडून क्षमायाचना
पी. नागराज यांनी ज्यावेळी संबंधित शिक्षिकेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आरोप फेटाळले असल्याीच माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील अशा प्रकारची तक्रार विद्यार्थी किंवा पालकांकडून मिळाली नसल्याचं म्हटलं. हे प्रकरण संवेदनशील असल्यानं चौकशीचे आदेश दिल्याचे मुख्याध्यापक म्हणाले.

३ ते ४ विद्यार्थी आणि पालकांनी तक्रार केल्याचं जिल्हा प्रशासनातील अधिकारी परमेश्वर सीआर यांनी सांगितलं. दुसरीकडे मंजुळा देवी यांनी आरोप फेटाळले आहेत. इतर शिक्षकांना देखील या प्रकरणाविषयी माहिती नाही. गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवलं आहे, असं परमेश्वर सीआर यांनी म्हटलं आहे.
Breaking News : मराठा आंदोलनाची ठिणगी पडलेल्या कोपर्डीत उद्यापासून पुन्हा आंदोलन
जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे शिवमोगा शहराध्यक्ष नझरुल्लाह यांनी शिक्षकांचं वक्तव्य चुकीचं असून त्यांचं निलंबन केलं जावं, अशी मागणी त्यांनी केली.
लाठीचार्जचे आदेश दिले हे जर सिद्ध केले तर आम्ही तिघेही राजकारण सोडू, अजित पवार यांचं विरोधकांना चॅलेंज

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here