नवी दिल्ली : देशातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या तुफान पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी मात्र हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळतात. अशात हवामान खात्याने (IMD) ७ सप्टेंबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागात ४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, कोकण, गोवा, रायलसीमा, पुडुचेरी, कराईकल इथे मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर द्वीपकल्पीय भारत, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशाची राजधानी नवी दिल्लीत आज म्हणजेच ०४ सप्टेंबर रोजी किमान तापमान २६ अंश आणि कमाल तापमान ३७ अंशांवर नोंदवले जाऊ शकते. या काळात आकाश निरभ्र राहू शकते आणि तेजस्वी सूर्यप्रकाश असू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत राजधानीत पावसाची शक्यता नाही.

Navi Mumbai : सर्वसामान्यांना एकीकडे दिलासा तर दुसरीकडे डाळीच्या दरात प्रचंड वाढ; वाचा आजचे भाव

या राज्यांमध्ये ५ आणि ६ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता

६ सप्टेंबर रोजी पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा, तेलंगणा, तामिळनाडू, केरळच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, पुडुचेरी, कराईकल आणि माहे येथे पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, उद्या म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, पुद्दुचेरी, कराईकल आणि माहे येथेही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

७ सप्टेंबर रोजी कुठे मुसळधार पाऊस…

हवामान खात्यानुसार, ७ सप्टेंबर रोजी ओडिशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याच दिवशी तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, कराईकल आणि माहे येथे मुसळधार पाऊस पडू शकतो.

Scary Video : बापरे! पोस्टमार्टम खोलीत अचानक पायऱ्या चालू लागल्या, भीती वाटत असेल तर सावधान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here