भीमराव कवडे हे काल दुपारच्या सुमारास श्रीगोंदा येथून जाणाऱ्या जामखेड ते काष्टी या रस्त्यावर उभे होते. यावेळी त्यांच्याजवळ एका विनानंबरच्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी एकाने मी सीआयडी अधिकारी आहे. पुढे गावात दंगल झाली आहे. त्यामुळे तुमच्या हातातील घड्याळ व गळ्यातील सोन्याची साखळी व्यवस्थित ठेवा. त्यानुसार कवडे यांनी गळ्यातील सोन्याची साखळी काढून खिशात ठेवली. यावेळी संबंधित व्यक्तीने साखळी रुमालात बांधून खिशात ठेवा, असे सांगत कवडे यांच्यासमोर रुमाल धरला. तसेच रुमालात कवडे यांच्या हातातील घड्याळ व गळ्यातील सोन्याची साखळी बांधून ठेवत असल्याचे भासवत सोन्याची साखळी हातचलाखीने काढून घेत संबंधित व्यक्तीने चोरून नेली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवडे यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काल दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल झुंजार करत आहेत.
आणखी बातम्या वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times