शेअर बाजारात कोणत्या क्षेत्रातील कंपनी कधी गुंतवणुकदारांना मालामाल करेल हे सांगता येत नाही. त्यातच दलाल स्ट्रीटवर गेल्या काही महिन्यांपासून बुल्सची चांदीच चांदी होत आहे. दलाल स्ट्रीटच्या सध्या अल्कोहोलिक बेव्हरेज मार्केटला नक्कीच आनंद होत असेल. भारत हे जगातील सर्वात आकर्षक आणि वेगाने वाढणारी मद्यपी बाजारपेठ असून व्हॉल्यूमच्या दृष्टीने चीन आणि अमेरिकेनंतर तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तसेच व्यवसायाच्या दृष्टीने या क्षेत्राची प्रगती तर झालीच पण शेअर्सच्या किंमतीही वाढल्या आहेत. या विभागातील बहुतांश शेअर्सनी सकारात्मक परतावा दिला असताना त्यापैकी काही मल्टीबॅगर्सही ठरले आहेत.
मद्य कंपन्यांचे मल्टीबॅगर स्टॉक्स
या यादीत सोम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड आघाडीवर असून कंपनीच्या शेअर्सनी एप्रिलपासून आतापर्यंत १०८ टक्के परतावा दिला आहे. यानंतर ब्रँडी आणि व्हिस्की बनवणाऱ्या टिळकनगर इंडस्ट्रीजने ९१% तर, युनायटेड स्पिरिट्सने ३४% परतावा दिला आहे.
दारू पिण्याचे प्रमाण घेऊन येणार तेजीआर्थिक वर्ष २०२३ मध्ये कठीण काळ पाहिल्यानंतर अल्कोहोलिक बेव्हरेजेस मार्केटला इतर ग्राहक कंपन्यांप्रमाणेच शेवटच्या तिमाहीत कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या घसरणीपासून दिलासा मिळाला. याशिवाय व्यावसायिक कार्यक्रम आणि विवाहसोहळे कोविडपूर्व स्तरावर परतल्यामुळे दारूच्या सेवनाला गती येईल आणि त्याचे प्रमाण वाढेल, असे विश्लेषकांचे मत आहे. स्टॉक्सबॉक्सच्या संशोधन विश्लेषक अनुशी वखारिया यांनी सांगितले की, “ICC विश्वचषक आणि आगामी सणासुदीच्या हंगामामुळे पुढील काही तिमाहींमध्ये आम्हाला चांगली मागणी अपेक्षित आहे.”
(Disclaimer: येथे दिलेला तपशील फक्त माहिती आहेत. हा गुंतवणूक सल्ला नाही. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)