ग्रँट रोड येथे असल्याची माहिती मिळाली होती. ” या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट सुरू होते. या प्रकरणाचा छडा लावून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या संकेतस्थळावर काही संपर्क क्रमांक देण्यात आले होते. तपास अधिकाऱ्याने ग्राहक असल्याचा बनाव करत त्या क्रमांकावर संपर्क साधला. एका महिलेने ठिकाण सांगितले. ती महिला आणि दोन महिलांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी आली. पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवला होता. महिला त्या ठिकाणी दाखल होताच तिघींना ताब्यात घेण्यात आले. यापैकी एका महिलेला अटक करण्यात आली, तर दोन महिलांची या रॅकेटमधून सुटका करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या साथीदारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूडच्या प्रॉडक्शन मॅनेजरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा देहव्यापाऱ्यातील बॉलिवूड कनेक्शन उघडकीस आले. येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकून मुंबई पोलिसांनी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक केली. देहव्यापारासाठी आणण्यात आलेल्या दोन तरुणींची सुटका देखील करण्यात आली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times