शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा वापरुन डिवचले जाते. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठीही प्रचंड पैसा खर्च झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरुन चांगलेच रान उठवले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ऑक्टोबर २०२२ मध्ये बीकेसी येथे झालेल्या दसरा मेळाव्यासाठी एसटी महामंडळाला १० कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे वेगवेगळ्या ८०० लोकांकडून आले होते. त्यानुसार एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आले होते. मुंबईत पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे झाले होते. या दोन्ही मेळाव्यांसाठी मिळून राज्यभरातून एकूण १८०० एसटी बसेस मुंबईत आल्या होत्या.
शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खर्चाचा मुद्दा उपस्थित केला होता. एसटी बसेस आणि जेवणाऱ्या व्यवस्थेसाठी शिंदे गटाने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे काँग्रेसने म्हटले होते. हे पैसे कुठून आले, याची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी करण्याची मागणीही काँग्रेसने केली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, एसटी महामंडळा देण्यात आलेले पैसे मुंबईतील डेपो व्यवस्थापकाकडे जमा करण्यात आले होते. वेगवेगळ्या लोकांनी मिळून एसटी महामंडळाकडे ९.९ कोटी रुपये जमा केले होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Thanks for such a pleasant post. This post is loaded with lots of useful information. Keep it up. If you are looking for the best information and suggestions related to men skinny jeans manufacturer then visit us.