ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कंगनाच्या मुंबई व मुंबई पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरून सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. शिवसेना अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आहे. याबद्दल विरोधकांनी शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना कंगनाला महत्त्व देतेय, असं विरोधकांनी म्हटलं आहे. या सगळ्या आरोपांना राऊत यांनी उत्तरं दिली. ‘कंगनाच्या वक्तव्याचा निषेध सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. फक्त शिवसेनेनं केलेला नाही. भाजपचे आशिष शेलार यांनीही तिला समज दिली आहे. पण शेलार यांनी हीच गोष्ट जोरात बोलायला हवी. कारण, महाराष्ट्र त्यांचाही आहे. तेही महाराष्ट्रात राजकारण करतात. हा शिवरायांचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही, कितीही मोठा असला तरी आम्ही शांत बसणार नाही,’ असंही राऊत म्हणाले.
वाचा:
‘शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती घाणेरड्या शब्दांत टिप्पणी करत असेल तर हा विषय एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा राहत नाही. हा महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा विषय होतो. जे जे महाराष्ट्राचं खातात, पितात. इथं राहतात त्यांचा आहे. मुंबईला कुणी पाकिस्तान म्हणणं हे अत्यंत गंभीर आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही याबद्दल आपली भूमिका मांडलीय, मी अभिनंदन करतो,’ असंही राऊत म्हणाले.
वाचा:
‘कंगना राणावतशी माझं व्यक्तिगत वैर नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडलीय. गृहमंत्री व परिवहन मंत्र्यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडलीय. त्यामुळं हा वाद आता संपायला हवा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times