नवी दिल्ली : पूर्व लडाख भागात भारत आणि चीनमध्ये तणाव कायम असला तरी भारतीय सेनेच्या जवानांनी चिनी नागरिकांची मदत करतानाच मानवतेचं एक उदाहरण समोर ठेवलंय. उत्तर सिक्कीम भागात अडकलेल्या तीन चिनी नागरिकांना मदत पुरवताना सेनेच्या जवानांनी भारताच्या उदारतेचा एक नवा धडा चीनसमोर ठेवलाय. सीमेवर सैन्याशी संघर्ष सुरू असला तरी नागरिकांचा जीव वाचवणं हे पहिलं कर्तव्य असल्याचं भारतीय जवानांनी आपल्या कृत्यातून दाखवून दिलंय.

ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडल्याचं समोर येतंय. १७,५०० फुटांच्या उंचीवर उत्तर सिक्कीमच्या पठारी भागात तीन रस्ता भटकले होते. त्यातच पारा शून्यापेक्षा खाली उतरल्यानं त्यांच्या अडचणीत भर पडली होती. शिवाय त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. त्यांची अडचण ओळखून भारतीय जवानांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली.

सेनेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, चिनी नागरिकांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता भारतीय सेनेचे जवान ताबडतोब घटनास्थळी दाखळ झाले. एक महिला आणि दोन पुरुष शून्याहून कमी तपमानात अडकून पडले होते.

वाचा :

वाचा :

भारतीय जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा वापर केला. तसंच त्यांना जेवण, गरम कपडे आणि वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध करून दिल्या.

वेळीच मदत मिळाल्यामुळे थोडा हुरूप आलेल्या चिनी नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रस्त्याचं मार्गदर्शन करून भारतीय जवानांनी त्यांना पुढचा मार्गही दाखवला. यासाठी चिनी नागरिकांनी भारतीय सेनेच्या जवानांचे आणि सेनेचे आभार मानलेत.

तर याचीच दुसरी बाजू म्हणजे, अरुणाचलच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच भारतीय नागरिकांचं कथितरित्या अपहरण करण्यात आलंय. अपहरण करण्यात आलेले पाच लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांकडून ताब्यात घेण्यात आलं. अपहृत नागरिकांच्या एका नातेवाईकानं ही माहिती दिलीय. ज्या लोकांचं अपहरण करण्यात आलंय त्यांची नावं टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी आहेत. काँग्रेसचे आमदार
(
,
MLA) यांनी हा धक्कादायक खुलासा केलाय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here