लखनऊ: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली. रविवारी रात्री वडील मुलाला ओरडले. त्यामुळे नाराज झालेल्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी तरुणाला गळफास घेतलेल्या मुलाला पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा आक्रोश ऐकून आसपासचे लोक जमले. घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.घटना टुंडला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पचोखरा गावात घडली. विजय सिंह यांचा मुलगा संदीप कुमार (१९) पचोखरा बाजारात फळं विकायचा. रविवारी विजय कोणत्या तरी कारणावरुन संदीपला ओरडले. त्यामुळे तो नाराज झाला आणि स्वत:च्या खोलीत निघून गेला. सोमवारी सकाळी बराच वेळ झाला तरी तो खोलीबाहेर आला नाही.कुटुंबियांनी दार वाजवलं. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी खिडकीतून आत डोकावून पाहिलं. त्यावेळी संदीपची अवस्था पाहून त्यांना जबर धक्का बसला. संदीपनं छताला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यानंतर घरात एकच आक्रोश सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. पोलिसांनी कुटुंबियांशी संवाद साधत घटनेची माहिती घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here