जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जळगावमध्ये सभा पार पडत आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, विद्याताई चव्हाण आणि रोहिणी खडसे उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या उपस्थित आज अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. बी. एस. पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत डॉ. बी. एस. पाटील?

डॉ. बी. एस. पाटील हे अमळनेरमधून तीन वेळा विजयी झाले होते. १९९५ पासून ते भाजपच्या तिकिटावर आमदार होते. भाजपनं तिकीट नाकारल्यानं ते अपक्ष लढले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. डॉ. बी.एस. पाटील पुन्हा एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेले होते. डॉ. बी. एस. पाटील यांच्या उमेदवारीमुळं अनिल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता डॉ. बी. एस. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानं अनिल पाटील यांच्यापुढं आव्हान निर्माण होणार आहे.

शिक्षक दिनादिवशी डॉ. बी. एस. पाटील राष्ट्रवादीत

भाजपचे माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे राजकीय गुरू डॉ.बी.एस.पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. नवीन विचारसरणी आवडत नाही त्यामुळे भाजप सोडत असून राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं पाटील म्हणाले. दोन वेळा डॉ.बी.एस.पाटील हे अमळनेर मतदार संघात आमदार होते. शिक्षक दिनाच्या दिवशी डॉ.बी.एस.पाटील यांनी त्यांचे शिष्य अनिल भाईदास पाटील यांना धक्का बसला आहे.
अजितदादा म्हणाले लाठीमाराच्या आदेशाचे आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकारण सोडा; शरद पवारांचं दोन वाक्यात प्रत्युत्तर

शिष्य अनिल भाईदास पाटील यांच्या विरोधात डॉ.बी.एस.पाटील हे मैदानात

भाजप नेते माजी आमदार डॉ.बी.एस. पाटी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भाजपाच्या नवीन विचारसरणीसोबत आमची नाळ जुडत नाही.भाजपमध्ये मला कुणाला ही दोष द्यायचा नाही. शरद पवार साहेब यांचे विचार आवडले ते पक्षासाठी घेत असलेली मेहनत आवडली त्यामुळे भाजप सोडून राष्ट्रवादीत शरद पवार गटात जात आहे,असे डॉ.बी.एस. पाटील म्हणाले.
वर्ल्डकप संघ जाहीर, निवड न झालेल्या खेळाडूंची चर्चा अधिक; चांगली कामगिरी, दमदार रेकॉर्ड तरी यांना नशिबाने दिला दगा

गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कार्यकर्ता होतो. लालकृष्ण आडवाणी , गोपीनाथ मुंढे यांच्याशी आमची विचारांशी नाळ होती. मात्र, भाजपची नवीन विचार सरणी ही आमच्या सारख्या लोकांना आता आवडत नाही. शरद पवार साहेब यांचे जे विचार आहेत, ते जे परिश्रम घेत आहेत, ते मला आवडले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे प्रतिक्रिया भाजप नेते माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी दिली आहे.

आशिया कप सुरु असताना बीसीसीआयचे अध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल, नेमकं घडलं तरी काय…

जळगावात शरद पवारांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here