नवी मुंबई: शहरात अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात अपघात झाला तर अनेक वेळा जखमी व्यक्तींना मदत करायचे सोडून अनेक वेळा पळ काढलेले प्रसंग दिसतात. त्यात गाड्यांची धडक झाली तर समजूतदार पणाची भूमिका घायची सोडून थेठ शिवीगाळ केली जाते. यावरच थांबून राहत नाहीत तर एकमेकांवर हात उचलले जातात. हातात जे असेल ते फेकून मारले जाते. मग त्यात एखाद्याचा जीव गेला तरी चालेल किंवा आपल्या भांडणामध्ये ट्राफिक झाली तरी चालेल अशी भूमिका भांडण कर्त्यांची पाहायला मिळते.
आईच्या चारित्र्यावर संशय; तरुणानं मेडिकल टर्मिनोलॉजीचा अभ्यास केला, अन् आईसह भावाचा काटा काढला
अशीच एक घटना वाशी परिसरामध्ये घडली असून ह्या घटनेमध्ये बस आणि कारची धडक झालेली आहे. ह्या घटनेमध्ये बसची कारला धडक झाल्यामुळे कारचालकाचे रौद्र रूप अनुभवायला बस प्रवाशांना मिळाले. प्रवाशांची बस जोरदार कारला धडकल्यामुळे कार चालकाने थेट तलवार काढली. या घटनेचे भयानक रूप प्रवाशांना प्रवास करताना पाहायला मिळाले. या घटनेमध्ये नवी मुंबई महानगर पालिकेच्या बसची कारला जोरदार धडक बसली. ह्या धडकेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडक होताच कारमधील चालक बाहेर येऊन बस चालकाला जोरजोरात शिवीगाळ करू लागला. त्यात तो शिव्या देऊनच थांबला नाही तर त्याने हातात तलवार घेऊन थेट बसवर सपासप वार करत राहिला. त्याने थेट चालकाला मारण्याची धमकी देखील दिली आहे.

वाईहून साताऱ्याच्या दिशेने निघालेला मराठा मोर्चा पोलिसांनी रोखला; काळ्या फिती बांधून ठिय्या आंदोलन

ही घटना रात्रीच्या वेळी १० ते ११ च्या दरम्यान घडली आहे. ह्या घटनेमध्ये कोणीही दुखापती झाले नसून फक्त गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ह्या घटनेसंदर्भातील आरोपीबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी सनी लांबा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीकडे तलवार कुठून आली, याचाही तपास करत आहेत. अपघातामधील बस उरण ते कोपर खैरणेला जाणारी होती. मात्र बस प्रवाशांना घेऊन प्रवास करत असतानाच ही घटना वाशीमध्ये घडली आहे. मात्र ह्या अपघातातील कार चालकाने थेट तलवार काढून वार केल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र ताबडतोब पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here