मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी कंगनाला चंबूगबाळं आवरून आपल्या राज्यात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचा कांगावा तिनं केला. तसंच, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान तिनं दिलं होतं.
वाचा:
राऊत यांना पत्रकारांनी आज या संदर्भात विचारलं असता ते संतापले. ‘मुंबईत कंगना १० ते १५ वर्षे राहते. तिला मराठी वाचता येतं का? मी काय बोललोय ते तिला कळलंय का? स्वत:चं ट्वीटर अकाऊंट स्वत: हँडल करायचं असतं. दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटी सेलला द्यायचं नसतं. त्यामुळं हे असे घोळ होतात,’ असं राऊत म्हणाले. राज्यातील राजकारणासाठी कोणी कंगनाला पुढं करतंय का असं विचारलं असता, ‘ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला जे बोलायचंय ते आम्ही बोललोय,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times