अल्पवयीन पीडित मुलीवर रुद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, न्याय मिळावा अशी विनंती केली आहे. शेजारी राहणाऱ्या एका मुलाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असे पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कुठेही वाच्यता केली तर तिच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मुलाने दिली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीने विष प्यायले. तिला वाचावण्यात यश आले. कुटुंबीयांनी तात्काळ तिला उपचारासाठी रुद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना हकिकत सांगितली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आले. पीडित आणि अत्याचार करणारा मुलगा हे दोघेही अल्पवयीन आहेत. त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
आणखी बातम्या वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times