पुणे: शहरातील करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी ८०० बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ३३० बेड रुग्णांसाठी उपलब्ध असून त्याच दरम्यान पत्रकार आणि अन्य नागरिकांचे बळी तिथे गेले आहेत. यामुळे तेथील त्रुटी समोर आल्या असून आजच्या बैठकीत सर्व मुद्यावर चर्चा झाली आहे. यामुळे जम्बो रुग्णालयामधील झालेल्या घटनांबाबत कोणीही जबाबदारी झटकता कामा नये. आता सर्वांनी त्रुटी दूर करून काम करण्याची गरज असल्याची भूमिका महापौर यांनी मांडली. ( on facilities )

वाचा:

पुणे शहर आणि जिल्ह्यातील करोना स्थितीबाबत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक विधान भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री , आरोग्य मंत्री राजेश टोपे, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता. या बैठकीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल प्रसार माध्यमांना माहिती दिली.

वाचा:

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहरातील करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शिवाजीनगर येथील सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर राज्य सरकार, पीएमआरडीए आणि महापालिकेच्या निधीतून ८०० बेडचे जंबो रुग्णालय उभारले गेले. ६०० ऑक्सिजन बेड आणि २०० आयसीयू बेड असतील, असे सांगण्यात आले. मात्र ३०० ऑक्सिजन बेड आणि ३० आयसीयू बेड प्रत्यक्षात उपलब्ध आहेत. त्यामुळेच अशी खोट माहिती का सांगण्यात आली? हे तपासून संबंधितावर कारवाई झाली पाहिजे. तसेच या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. थेट रुग्ण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here