जनरल नरवणे लडाखमध्ये दोन दिवसांच्या भेटीवर होते. २ आणि ३ सप्टेंबरला त्यांनी चीनला लागून असलेल्या भारतीय लष्कराच्या आघाडीच्या चौक्यांना भेट दिली. तसंच भारत-चीनमध्ये सुरू असलेला तणाव पाहता त्यांनी तेथील सुरक्षेचा आढावा घेतला.
संपूर्ण देशाचं लक्ष आपल्यावर आहे, असं म्हणत नरवणे यांनी जवानांना संबोधि केलं. तसंच लडाखमध्ये चिनी सैनिकांना पिटाळून लावणाऱ्या जवानांचे त्यांनी कौतुक केले. जवानांनी आपला जोश कायम ठेवून धैर्य आणि संयमही राखावा, असं नरवणे यांनी सांगितलं.
जोशसोबत तुम्हाला धैर्य आणि संयमाने काम करायचे आहे, असं लष्कर प्रमुख म्हणाले. सीमेवर अजूनही तणावाची स्थिती आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून अवश्यक त्या ठिकाणी जवानांची तैनाती केली गेली आहे, असं जनरल नरवणे यांनी सांगितलं. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times