मुंबई/ठाणे : कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यंदाची दहीहंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचीच होणार. शिंदे गटाला पोलिसांनी आधीच परवानगी दिली असल्याने आणि आता त्यात बदल करणे कठीण असल्याने उद्धव ठाकरे गटाला गुरुदेव हॉटेल आणि कुबा रेस्टॉरंट यामधील जागेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आधी एनओसीसाठी आधी अर्ज केला आणि त्याप्रमाणे त्यांना दिली. आता त्याच जागेवर ठाकरे गटाला एनओसी देऊ शकणार नाही. त्यामुळे त्या गटाने जवळच्या अन्य एखाद्या जागेवर आयोजन करावे, असे म्हणणे महात्मा फुले पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी यांच्यातर्फे राज्य सरकारने न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर मांडले.

शिंदेंना खुर्ची द्यायला नको, म्हणून ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपदच नाकारलं, कीर्तिकरांचा आरोप
त्यानंतर आता ऐनवेळी पोलिसांना आधीच्या निर्णयात बदल करणे कठीण आहे, त्यामुळे तुम्ही यंदाच्या वर्षी तडजोड करा आणि त्याग करा, असे खंडपीठाने ठाकरे गटाला सुचवले. त्यानंतर ठाकरे गटाचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख सचिन बासरे यांनी गुरुदेव हॉटेल आणि कुबा रेस्टॉरंट यामधील जागेत आयोजन करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार खंडपीठाने आदेश काढला.

तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, विजयभाऊंची काय गॅरंटी? बच्चू कडूंचा वडेट्टीवारांना टोला
पोलिसांनी त्या जागेसाठी आयोजक बासरे यांना तात्काळ एनओसी द्यावी आणि कल्याण – डोंबिवली महापालिकेने आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, तसेच पोलिसांनी आयोजनाच्या बाबतीत पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.

एवढं निर्घृण सरकार कधी पाहिलं नाही, मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; उद्धव ठाकरेंनी सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here