पुणे: विद्येचं माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थी असुरक्षित असल्याच्या घटना घडत आहे. टिळक रोड सदाशिव पेठ परिसरत एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका तरुणाने भरदिवसा कोयत्याने वार केल्याची घटना चर्चेत असताना त्याच परिसरात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तीन गर्दुल्यांनी वार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंची कमी असल्याने तणावात, २३ वर्षीय तरुणीकडून आयुष्याची अखेर, आईने पाहताच हंबरडा फोडला
१) आदित्य उर्फ आदी जीवन गायकवाड ( वय २१ रा. सर्वे नं १३१/०१ आम्रपाली बुद्धीविहारजवळ, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे)
२) साहिल उर्फ ब्लॅकी शंकर वाघमारे (वय २३ वय २१ रा. सर्वे नं १३१/०१ आम्रपाली बुद्धीविहारजवळ, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे)
३) अनिकेत उर्फ ऑन्डी संग्राम सरोदे ( वय २३ वय २१ रा. सर्वे नं १३१/०१ आम्रपाली बुद्धीविहारजवळ, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे) असे या आरोपींचं नाव आहे.

पहिल्या पत्नीने माझ्या पत्नीची हत्या केली, पोलिसांना फोन, तपासात वेगळंच सत्य उघड, ऐकून पोलिसांना शॉक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचे मित्र सुभाष शेवाळे आणि ओम विलास भिलारे याच्यासोबत खजिना वीर परिसरातून रात्री उशिरा लायब्ररी मधून घरी जात होता. शक्ती स्पोर्ट समोर पांढऱ्या रंगाचे ऍक्टिवा गाडीवर आलेल्या तीन आरोपींपैकी एकाने कॉलर पकडून गाडी जवळ घेऊन गेला आणि गाडीवर ठेवलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात घालून त्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. म्हणून त्या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here