मुंबई: महाराष्ट्रात संसर्गाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे तब्बल २० हजार ४८९ नवीन रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. त्याचवेळी दिवसभरात आणखी ३१२ जण करोनाने दगावले असून १० हजार ८०१ जणांना बरे वाटल्याने आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने नवा कळस गाठला आहे. २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद आज झाली. आज २० हजार ४८९ नवीन करोना बाधित आढळले असून हा आकडा पाहून सारेच हादरले आहेत. राज्यात आता अॅक्टिव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २० हजार ६६१ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या ४५ लाख ५६ हजार ७०७ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ८ लाख ८३ हजार ८६२ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
राज्यात आज दिवसभरात ३१२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २६ हजार २७६ रुग्ण करोनामुळे दगावले असून सध्याचा मृत्यूदर २.९७ टक्के इतका आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times