दीपेश सावंत याला उद्या सकाळी ११ वाजता कोर्टा हजर करण्यात येईल. सुशांत प्रकरणात ड्रग्स मागवणं आणि हाताळण्याच्या त्याच्यावर आरोप आहे. नोंदवलेले गेलेले जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिली.
रिया चक्रवर्ती रविवारी एनसीबीसमोर हजर होईल. तर रिया आणि शौविक आणि दीपेश यांची समोरासमोर चौकशी केली जाईल, असं एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन यांनी सांगितलं. तर दुसरीकडे सीबीआयकडून सुशांतसिंहची बहिण मितू सिंहची पुन्हा चौकशी करण्यात आली.
चौकशीत रियाचे ड्रग्स कनेक्शन आढळून आल्यास तिला अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे एनसीबीच्या कारवाईकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times