सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. शनिवारी त्यांचा स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलगा आणि दीर सुरेश पाटील यांचे अहवाल दोन दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सांगलीत उपचार सुरू होते. शनिवारी तिघांनाही उपचारासाठी पुण्याला हलवले आहे. आमदार सुमन पाटील यांनी तिघांचीही प्रकृती ठिक असल्याचे सांगितले आहे. ( NCP Mla Tests Positive For )

वाचा:

सांगली जिल्ह्यात संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांच्या घरात तिघांना करोनाचा संसर्ग झाला. दोन दिवसांपूर्वीच आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील आणि मुलगा रोहित पाटील या दोघांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यानंतर दोघांवर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आमदार सुमन पाटील यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. तिघांची प्रकृती ठीक असून, गेल्या दोन दिवसात संपर्कात आलेल्या लोकांनी वैद्यकीय तपासणी करून दक्षता घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

वाचा:

दरम्यान, आटपाडी-खानापूर मतदार संघाचे आमदार , जतचे आमदार विक्रम सावंत तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक यांचा करोना चाचणी अहवालही शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करोना बाधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात नागरिकांनी संसर्गाची धास्ती घेतली आहे.

वाचा:

शनिवारी उच्चांकी ३६ रुग्णांचा मृत्यू

सांगली शहरासह जिल्ह्यात करोना बळींची संख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी उच्चांकी ३६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आजवर करोना संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या ६३३ वर पोचली असून तर शनिवारी नव्याने ६१२ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ४०० वर पोहोचली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here