म. टा. प्रतिनिधी, पुणे : ढोल-ताशा पथकात सरावासाठी कोंढवा येथे गेलेल्या १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा सासवड परिसरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती दिल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचा टोळक्याने खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोन सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे.

साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द) आणि ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणकर आणि कापरे सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तानाजी सावंतांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, शिंदेंच्या कानावर खबर, मुख्यमंत्र्यांकडून रातोरात बदल्या!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात राहायला आहे. शनिवारी (२ सप्टेंबर) तो ढोल ताशा पथकात सरावासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात रविवारी दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

बापाची तब्येत बिघडली पण लेकीने हुंकार भरला, पप्पा आता आरक्षण घेऊनच घरी परतायचं, त्याशिवाय माघार नको!
अल्पवयीन मुलाबरोबर गेलेला एकजण कोंढव्यातील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या पायाला जखम झाली होती. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. लोणकर आणि कापरे यांनी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला सासवडला नेले.

तेथे त्याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संदीप भोसले तपास करीत आहेत.

जरांगे पाटलांना काही झाल्यास आम्ही सरकारला पायउतार होण्यास भाग पाडू, बीडमधील रणरागिनी आक्रमक!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here