सिंधुदुर्गः जिल्ह्यात करोनाने रुग्णसंख्येचा आकडा दीड हजारावर गेला आहे. २४ जण करोनाने दगावले आहेत. किमान पन्नास ते शंभर सव्वाशेपर्यंत रोज नव्याने रुग्ण आढळत आहेत. यंदा चाकरमानी मंडळी जरी मोठ्या प्रमाणावर आली नसली तरी करोना बाधित रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत . ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासू रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

शनिवारी एकूण १३२ करोना बाधित नवीन रुग्ण आढळून आले. काही दिवसांपासून हे प्रमाण शंभर-सव्वाशेवर गेल्याने चिंतेत भर पडली आहे. एवढ्या आपत्कालीन परिस्थितीतही जिल्ह्यात आलेल्या मुंबईकरांनी जास्तीत जास्त खबरदारी घेत सरकारी नियमांचे पालन केले. तरी अनेक चाकरमान्यांनी मुंबईत राहून गणेशोत्सव साजरा केला, असं खासदार विनायक राऊत म्हणाले.

पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची टीम कार्यरत असली तरी करोना आटोक्यात येत नाही.
जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडत आहे. रुग्णालयाचे ११ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील काही पोलिसांनाही करोनाने गाठले आहे.

जिल्ह्यात शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८४९ करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आणखी १३२ जण करोना बाधित आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here