नवी दिल्ली : AI चिप बनवणारी अमेरिकन कंपनी Nvidia Corp गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. मायक्रोसॉफ्ट आणि Google सारख्या जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या Nvidia कडून अधिकाधिक चिप्स मिळविण्यासाठी स्पर्धा करत आहेत. सौदी अरेबिया आणि यूएई देखील कंपनीकडून हजारो चिप्स खरेदी करत आहेत. Tencent आणि Alibaba या चिनी कंपन्याही Nvidia च्या दारात उभ्या आहेत. यावरून Nvidia च्या चिपला जगात किती मागणी आहे हे दिसून येते.

चॅटबॉट्स आणि इतर टूल्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्या दरम्यान कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

हुआंग यांच्या भेटीनंतर मोदींनी ट्विट केले की, ‘एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्यासोबत चांगली भेट झाली. एआयच्या जगात भारताच्या संभाव्यतेबद्दल आम्ही तपशीलवार बोललो. हुआंग यांनी भारताने या क्षेत्रात उचललेल्या पावलांचे कौतुक केले आणि भारतातील प्रतिभावान तरुणांबद्दल ते खूप उत्साहित आहेत. कंपनीने ट्विटमध्ये भारताला जागतिक तंत्रज्ञान महासत्ता म्हणूनही वर्णन केले आहे. कंपनीने म्हटले आहे की पीएम मोदींसोबत हुआंग यांची भेट आमच्या आणि जागतिक तंत्रज्ञान महासत्तेमधील वाढती भागीदारी दर्शवते.

अब्जाधीशाची राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत उडी, 10 वृद्धांसह उभारली सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कंपनी
कोण आहेत जेन्सेन हुआंग ?

Nvidia ची स्थापना जेन्सेन हुआंग यांनी केली होती. हुआंगयांचा जन्म १९६३ मध्ये तैवानमध्ये झाला होता. त्यांचे बालपण तैवान आणि थायलंडमध्ये गेले. १९७३ मध्ये त्यांच्या पालकांनी त्यांना अमेरिकेत त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवले. काही दिवसांनी ते अमेरिकेलाही गेले. Nvidia ची स्थापना एप्रिल १९९३ मध्ये झाली. सुरुवातीला या कंपनीने व्हिडिओ-गेम ग्राफिक्स चिप्स तयार केल्या. जेव्हा कंपनीचा स्टॉक १०० डॉलर्सवर पोहोचला तेव्हा हुआंगने त्यांच्या हातावर कंपनीच्या लोगोचा टॅटू काढला. Nvidia सध्या १.१९९ ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह जगातील सहावी सर्वात मौल्यवान कंपनी आणि अमेरिकेची पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्याची मार्केट कॅप वॉरेन बफेच्या बर्कशायर हॅथवे, मार्क झुकरबर्गच्या मेटा, एलोन मस्कच्या टेस्लापेक्षा जास्त आहे.

४३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह हुआंग जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २७ व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती २९.४ अब्ज डॉलरने वाढली आहे. Nvidia मध्ये त्यांची ३.५ टक्के हिस्सेदारी आहे. कोरोनाच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. क्रिप्टो बूममुळे चिप्सचा वापर वाढला होता. मात्र त्यानंतर कंपनीच्या समभागांची किंमत दोन तृतीयांशने घसरली. आता एआयच्या वाढत्या ट्रेंडमुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा वधारत आहेत. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here