नवी दिल्ली : तुम्ही एव्हाना ऊपरवाला जब भी देता है, छप्पर फाड के देता है’ ही म्हण ऐकलीच असेल. यासोबतच नशिबाने दुर्दैवानं हिरावून घेतले की माणसाच्या पायाखालची जमीनही सरकते. आकाशातून जमिनीवर उतरण्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील, पण ज्या व्यक्तीची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याने यशाची चवही चाखली आणि अपयशाची उतराई दोन्ही पाहिल्या आहेत.

कोण आहेत बी.आर शेट्टी
शेट्टी हे जगातील सर्वात श्रीमंत कन्नडसोबतच दुबईतील सर्वात बड्या फार्मास्युटिकल कंपनी एनएमसीचे मालक म्हणून ओळखले जातात. १ ऑगस्ट १९४२ रोजी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कापू शहरात जन्मलेल्या बावगुत्तू रघुराम शेट्टी यांनी एक साधा वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आपल्या मेहनतीने कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक बनले.

ट्रेनी म्हणून सुरूवात मग बँकिंग क्षेत्रातील स्टार… हजारो कोटींच्या घोटाळ्याने शिखरावरुन शून्यावर
फक्त $8 सह UAE गाठले
आपल्या आयुष्यात अब्जावधी संपत्ती कमावणारी व्यक्तीने १९७३ मध्ये जवळजवळ रिकाम्या हाती दुबई गाठली. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबाला पैशाचा चांगला स्रोत हवा होता आणि शेट्टींना हा स्रोत दुबईत सापडला. येथे त्यांना एका कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधीची नोकरी मिळाली आणि नोकरीसाठी राजकारणात येण्याचे स्वप्न सोडून दुबईला गेले.

संयुक्त अरब अमिराती येथे हेल्थकेअर क्षेत्रात नशीब चमकावणारे शेट्टी हे पहिले भारतीय असून त्यांनी १९७० मध्ये एनएमसी हेल्थ सुरू केले, जी नंतर २०१२ मध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणारी देशातील आपल्या प्रकारची पहिली कंपनी बनली. परदेशात एका क्षेत्रात विशिष्ट ओळख निर्माण करणारे शेट्टी यांच्यासाठी प्रवास सोपा नव्हता. ७० च्या दशकात शेट्टी यांनी फक्त ८ डॉलर्स घेऊन यूएई गाठले आणि वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून करिअरला सुरुवात केली.

नशिबाने कशी थट्टा मांडली! एकेकाळी पैशांच्या राशीत लोळणारा अब्जाधीश पाण्यासोबत खातोय ब्रेड
वित्त क्षेत्रात ठेवले पाऊल
त्यांनी १९८० मध्ये अमिरातीतील सर्वात जुना रेमिटन्स व्यवसाय UAE एक्सचेंज सुरू केला. UAE एक्सचेंज २०१८ मध्ये UK-स्थित एक्सचेंज कंपनी Travelex आणि अनेक लहान पेमेंट सोल्यूशन्स प्रदाते आणि शेट्टीच्या फिनबलर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक झाले. आरोग्यसेवा आणि आर्थिक सेवांव्यतिरिक्त, शेट्टी यांनी आदरातिथ्य, अन्न आणि पेये, फार्मास्युटिकल उत्पादन आणि रिअल इस्टेटमध्ये देखील काम केले आहे.

एक अहवाल अन् नशिबाने कलाटणी घेतली
मडी वॉटर रिसर्चचे संस्थापक आणि शॉर्ट सेलर कार्सन ब्लॉक यांनी एका अहवालात एनएमसी हेल्थवर बनावट मालमत्तेचे आकडे दिले आणि कंपनीच्या मालमत्तेची चोरी केल्याचा आरोप केल्याने शेट्टी यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. यानंतर अवघ्या तीन महिन्यांनंतर NMC शेअर्सवर लंडन स्टॉक एक्स्चेंजवर बंदी आणली गेली आणि कंपनीवर सुमारे $५ अब्ज (सुमारे ४० हजार कोटी रुपये) कर्ज असल्याचे जाहीर केले.

Vijay Mallya Success Story: वडिलांच्या चपराकीने बनले ‘लिकर किंग’, एका चुकीमुळे होत्याच नव्हतं झालं
बुर्ज खलिफामध्ये दोन मजले शेट्टींचे
शेट्टीच्या UAE मधील वैयक्तिक मालमत्तांमध्ये जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथील दोन मजले आणि पाम जुमेरिया येथील व्हिला यांचा समावेश आहे. अरेबियन बिझनेसला त्यांनी सांगितले की, “आव्हाने नेहमीच असतात, परंतु जेव्हा तुम्ही त्यांच्यापुढे झुकत नाही आणि योग्य मार्गाने गोष्टी करत नाही, तेव्हा ते तुमच्या मार्गाबाहेर जातात. आम्ही नंबर वन आहोत.”
भारतात व्यवसाय वाढला

दुबईत यशस्वी व्यवसाय सुरू केल्यावर शेट्टी पाय भारताकडे वळले. भारतातही आपला व्यवसाय वाढवण्याची शेट्टी यांची इच्छा होती. परिणामी त्यांनी येथील काही रुग्णालयांमध्ये भांडवल गुंतवले आणि त्यांची परिस्थिती बर्‍यापैकी सुधारून त्यांना यश मिळवून दिले. याशिवाय २०१८ मध्ये शेट्टीने भारतातील पहिले सेव्हन स्टार हॉस्पिटल सेव्हन हिल्स हॉस्पिटल देखील विकत घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here