नवी दिल्ली : लोक न्हाव्याच्या व्यवसायाला सहसा कमी आखतात. कमी कमाईचे हे काम एका विशिष्ट वर्गाशी निगडीत आहे, पण काळानुसार गोष्टी बदलल्या आहेत. आज केस कापणे फॅशनशी जोडले जाते. देशभरात केस कापून आज लोक लाखोंची कमाई करतात. जिथे पूर्वी छोट्या आरशासमोर खुर्चीवर बसून काही रुपयात केस कापायचे तिथे आज मोठमोठे सलून आहेत. लक्झरी सुविधांसह AC सलून आता तुम्हाला तुमचे केस आरामात कापून मिळतात. आता केस कापणे हा फॅशनचा भाग बनला आहे.

न्हाव्याचे काम ट्रेंडी आणि स्टायलिश करण्यात या एका व्यक्तीचा मोठा वाटा असून त्याने केस कापण्याकडे लोकांचा दृष्टीकडे बदलला आहे. सुप्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी हे सिद्ध केले की न्हावी म्हणून काम करूनही लोक करोडो कमवू शकतात.

​एकेकाळी ऑफिस बॉय म्हणून केली​ नोकरी, बीडचे दादासाहेब आज आहेत दोन कंपन्यांचे मालक​
लंडनची पदवी तरीही केस कापले
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आवडत्या हेअर स्टाइलिस्टपैकी एक जावेद हबीब यांची सौंदर्य क्षेत्रात एक विशेष ओळख आहे. जावेद हबीब यांचे देश-विदेशात सलून आहेत. केस कापण्याच्या व्यवसायातून ते करोडो रुपये कमावतात, पण जावेद हबीब यांच्याकडे परदेशी पदवी आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यांनी लंडनच्या मॉरिस इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून फ्रेंचमध्ये पदवी संपादन केली. जावेद यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते, पण नशिबाने त्यांना वडिलोपार्जित कामाकडे ओढले.

राष्ट्रपती भवनात जन्म
जावेद हबीब यांचे आजोबा नझीर अहमद हे लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासह ब्रिटिश सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांचे वैयक्तिक हेअर स्टाईलिस्ट होते जे स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वैयक्तिक हेअर स्टाईलिस्ट बनले. त्यांच्या वडिलांनंतर त्यांचा मुलगा आणि जावेद हबीब यांचे वडील हबीब अहमद नेहरूंचे हेअर स्टाईलिस्ट बनले. नेहरूंशिवाय ते राजमाता गायत्री देवी आणि देशाच्या अनेक राष्ट्रपतींचे हेअर स्टाईलिस्ट बनले त्यामुळे त्यांचे कुटुंब राष्ट्रपती भवनातच राहायचे. जावेद हबीब यांचा जन्मही राष्ट्रपती भवनाच्या ब्लॉक १२ मधील घर क्रमांक ३२ मध्ये झाला होता.

घर सोडलं, एकेकाळी हॉटेलमध्ये धुतली भांडी, मग सुरू केला रेस्टॉरंट व्यवसाय; आज ३०० कोटींचे मालक
अनिच्छेने केस कापायला सुरुवात केली
जावेदला न्हावी म्हणून काम करायचे नव्हते. लंडनमध्ये शिकत असताना त्यांनी मॅकडोनाल्डचे आउटलेट पाहिले आणि तिथून स्वतःचे काम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. जेव्हा लोकांना बर्गर विकून कमाई करतात तर हेअर ड्रेसर का नाही, असे त्यांचे मत होते. पुढे काय जावेद यांनी त्यांच्या वडिलांकडून केशरचनेचे बारकावे शिकले. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी लंडनमधील हेअर डिझायनिंग स्कूलमधून व्यावसायिक अभ्यासही केला आणि त्यानंतर त्यांनी केस कापण्याचा व्यवसाय सुरू केला.

युरोपियन कंपनी, दोनदा दिवाळखोर, भारतात येऊन झाली लोकप्रिय; मोच्याच्या मुलाने उभी केली फूटवेअरची चेन
पहिल्या वर्षी ५० सलून उघडले
जावेद यांनी आपल्या कौशल्याने नाईच्या कामाला ट्रेंडी आणि स्टायलिश लुक दिला. लोकांना हेअर कटिंग आणि ग्रूमिंगचे प्रशिक्षण देणे सुरू करत केरळमध्ये पहिले आउटलेट उघडले. पहिल्याच वर्षी त्यांनी ५० हून अधिक सलून उघडले. कात्री आणि कंगवा यांच्याशी त्यांचा वडिलोपार्जित संबंध होता, परंतु हबीबने त्यांना एक नवीन रूप दिले.

जावेद हबीब बनले सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट
काही वर्षांतच जावेद सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट बनले. आज ते बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या केसांचे स्वरूप व्यवस्थापित करतात. आपल्या कामातून त्यांनी स्वतःला इतके मोठे केले आहे की आज राजकारणी, उद्योजक आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे म्हणून ओळखले जातात. आज जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लिमिटेडचे संपूर्ण भारतात ९०० हून अधिक सलून असून फोर्ब्सनुसार, जावेद हबीब यांची एकूण संपत्ती ३०० कोटींहून अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here