” पश्चिम बंगालच्या मातीतून सुरू करत आहे. संस्कृती आणि साहित्याने भारलेल्या वातावरणात येऊन मन आनंदी होते. बंगालच्या वैभवशाली कला आणि संस्कृतीला नमन करण्याची संधी यामुळे प्राप्त होते. भारतातील कला, संस्कृतीचे सामर्थ्य व वैभव जगभरात पोहोचावे, असा यामगील उद्देश आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतीय कला, संस्कृती आणि साहित्य जगतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भारतीय कला, संस्कृती आणि वारसा २१ व्या शतकात संरक्षित केले पाहिजे. भारताचे वैभव पुन्हा जगासमोर मांडायला हवे, त्यात सुधारणा केली पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.
ईश्वरचंद विद्यासागर यांची २०० वी जयंती आपण साजरी करत आहोत. २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील, त्याचवेळी महान समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांची २५० वी जयंती असणार आहे. हा सुखद योगायोग आहे. आदि शंकराचार्य, अंदाल, अक्का महादेवी, भगवान बसवेश्वर, गुरु नानक देव यांनी दाखवलेल्या मार्ग आजही आपल्याला प्रेरित करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावे लाल किल्ल्यात संग्रहालय बनवण्यात आले आहेत. अंदमान-निकोबार बेट समूहांना नेताजींचे नाव देण्यात आले आहे. नेताजींच्या संदर्भातील दस्त सार्वजनिक करण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून होत होती, ती आता पूर्ण झाली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
वर्तमान शतक तुमचे असले, तरी २१ वे शतक भारताचे असेल, असे भाकित स्वामी विवेकानंद यांनी मिशिगन विद्यापीठात केले होते. ते आपण सदैव लक्षात ठेवायला हवे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन आहे. त्यांचे नाव घेऊन फुशारक्या मारण्यासाठी आणि चमकण्यासाठी काही लोकं दिल्लीहून आले आहेत, अशी बोचरी टीका करत स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावरूनच आम्ही जात आहोत, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. सीएए, एनआरसी व एनपीआर याचा आम्ही विरोध करत असून, काही झाले तरी पश्चिम बंगालमध्ये हे लागू केले जाणार नाही, हे निर्णय मागे घ्यावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पष्टपणे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या राज्याच्या हिस्स्याचे २८ हजार कोटी रुपये केंद्राने शक्य तितक्या लवकर द्यावेत, अशी मागणीही केली असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट झाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times