करोनानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. या नियमाचे पालन एका खेळाडूने केले नाही तर त्याची संघाने थेट हकालपट्टी केल्याचेच पाहायला मिळाले आहे.

वाचा-

करोनानंतर क्रिकेट खेळताना चेंडूला चकाकी आणण्यासाठी घाम किंवा थुंकी लावता येणार नाही, असे आयसीसीने यापूर्वीच सांगितले होते. त्याचबरोबर चेंडूला कोणत्या गोष्टी लावायच्या नाहीत, हेदेखील आयसीसीने स्पष्ट केले होते. पण एका खेळाडूने चेंडूला चक्क सॅनिटायजर लावल्याचे पाहायला मिळाले. पण या चुकीला संघाने माफी केलेली नाही, तर त्याच्यावर निलंबनाची करण्यात आली आहे.

इंग्लंडच्या एका कौंटी सामन्यात एका गोलंदाजाने चेंडूला थेट सॅनिटायजर लावल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात या गोलंदाजाने तीन विकेट्सही मिळवल्या होत्या. पण सामन्यानंतर या गोलंदाजाने चेंडूला सॅनिटायजर लावल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या गोलंदाजाला थेट निलंबित करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.

वाचा-

इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने याबाबतचा तपास सुरु केला आहे. ससेक्स या संघाने आपल्या वेबसाईटवर सांगितले की, ” आमच्या संघाचा एक सामना मिडलसेक्सबरोबर झाला होता. या सामन्यात आमच्या संघातील वेगवान गोलंदाज मिचने चेंडूला सॅनिटायजर लावले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता इंग्लंड क्रिकेट मंडळ करत आहे. त्यामुळे जोपर्यंत हा तपास सुरु असेल तोपर्यंत मिचचे आम्ही निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे, त्यामुळे यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही.”

वाचा-

इंग्लंडमधील ससेक्स या संघाकडून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिच क्लेडन खेळत होता. ससेक्स आणि मिडलसेक्स या दोन संघांतील सामन्यांमध्ये मिचने चेंडूला सॅनिटायजर लावले होते. त्यामुळे आता त्याचे निलंबन करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here