अर्जुन त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग फिल्मसिटीमध्ये करत होता. या सिनेमात त्याच्यासोबत रकुलप्रीत सिंग आणि नीना गुप्ताही आहेत. या सिनेमाचं नाव अजून निश्चित करण्यात आलं नसून, या सिनेमाची कथा भारत- पाकिस्तानच्या विभाजनाच्या पाश्वभूमीवर आहे.
विशेष म्हणजे अर्जुनने एक दिवस आधीच या सिनेमाच्या अपडेटबद्दल सोशल मीडियावर सांगितलं होतं. अर्जुनने स्वतःचा एक फोटो शेअर करत सिनेमाच्या निर्मात्यांचे आभार मानले होते. करोनाच्या पाश्वभूमीवर निर्मात्यांनी सर्व सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण गोष्टी पुरवल्याबद्दल अर्जुन कपूरने त्यांचे आभार मानले होते.
बोनी कपूर यांचा स्टाफही होता पॉझिटिव्ह
काही महिन्यांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरातला स्टाफही करोना पॉझिटिव्ह होता. असं असलं तरी त्यांच्या कुटुंबातील कोणालाही करोनाची लागण झाली नव्हती. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
स्टार्स घेत आहेत आवश्यक ती सुरक्षा
या करोना काळात प्रत्येक स्टार शूटिंगला जाण्यापूर्वी आवश्यक ती सुरक्षा घेत आहेत. सर्व नियमांचं पालन करून चित्रीकरण करण्यात येत आहे. पण तरीही करोनामुळे दरदिवशी कोणत्या ना कोणत्या सिनेमाचं किंवा मालिकांचं चित्रीकरण थांबत आहे.
मलायका अरोराच्या सेटवर सात लोक करोना पॉझिटिव्ह
काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा टीव्ही शो इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर सात लोक करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानंतर तातडीने या शोचं चित्रीकरण बंद करण्यात आलं. मलायका आधीपासूनच या शोवर येण्यास घाबरत होती. पण तिची मनधरणी केल्यानंतर तिला परत शोमध्ये बोलावण्यात आलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times