सुशांत प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की या प्रकरणात स्वतःहून अटक होण्यास तयार आहे. रिपोर्ट्सनुसार, रियाच्या वकिलांनी सांगितलं की, ‘रिया चक्रवर्ती अटक होण्यास तयार आहे. कारण तिच्याबद्दल चांगल- वाईट बोलून तिच्यावर लक्ष्य केलं जात आहे. एखाद्यावर प्रेम करणं जर गुन्हा असेल तर ती (रिया) याची शिक्षा भोगायला तयार आहे. निर्दोष असल्यामुळेच तिने आतापर्यंत बिहार पोलीस, सीबीआय, ईडी किंवा एनसीबीने लावलेल्या खटल्यांवर अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी कोणत्याही न्यायालयात गेली नाही.’
शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंतच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीलाही ताब्यात घेतलं जाऊ शकतं असा अंदाज वर्तवला जात आहे. एनसीबीच्या चौकशीसाठी उशीरा निघाल्यावर झाल्यावर आणि त्यानंतर सतीश मानेशिंदे यांच्या विधानानंतर आता रियाचं कुटुंब आणि तिच्या वकिलांना या गोष्टीची जाणीव झाली आहे की रियाची अटक टाळणं अवघड आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. शौविक, सॅम्युअल आणि दिपेश यांच्यासमोर आज रियाची चौकशी केली जाऊ शकते. शौविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये ठेवण्यात आलं आहे तर दिपेशला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times