बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका तरुणीनं तिच्या लिव्ह-इन पार्टनरची छातीत चाकू भोसकून हत्या केली. दोघे एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते. त्याच फ्लॅटमध्ये त्यांच्यात वाद झाला. गेल्या साडे तीन वर्षांपासून दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघांमध्ये वाद झाला. त्यात तरुणानं तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीनं स्वयंपाकघरातील चाकूनं तरुणाच्या छातीवर सपासप वार केले.

रेणुका (वय ३४ वर्षे) असं आरोपी तरुणाचं नाव असून ती गेल्या साडे तीन वर्षांपासून जावेद (२९ वर्षे) नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. रेणुकाच्या हल्ल्यात जावेद रक्तबंबाळ झाला. त्यानंतर रेणुकाच त्याला रुग्णालयात घेऊन जात होती. मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा रस्त्यातच जीव गेला. जावेदला रुग्णालयाजवळ सोडून रेणुका लगेच फ्लॅटवर आली. ती तिचं सामान घेऊन पळण्याच्या प्रयत्नात होती. मात्र सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी तिच्या घराचा दरवाजा बाहेरुन बंद केला आणि पोलिसांना कॉल केला. सूचना मिळताच पोलीस फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी रेणुकाला अटक केली.
तीव्र पोटदुखी, ४८ तास उलट्या; ७ वर्षांच्या मुलाचा जीव वाचला; पोटात सापडले तब्बल ५०…
जावेद मूळचा केरळचा रहिवासी आहे. घटना बंगळुरुच्या हुलिमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. इथल्या सर्व्हिस सोसायटीत असलेल्या फ्लॅटमध्ये दोघे राहत होते. गेल्या साडे तीन वर्षांपासून त्यांचा परिचय होता. दोघे मोबाईल दुरुस्तीचं काम करायचे. या दरम्यान कधी लॉजवर, तर कधी भाड्यानं घर घेऊन दोघे राहायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद आणि रेणुका लिव्ह-इनमध्ये राहत होते. मात्र त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. ५ सप्टेंबरमध्ये दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी दोघांना एकमेकांना मारण्याची धमकी दिली. त्याच सुमारास जावेदनं रेणुकाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. ते ऐकून रेणुका संतापली. तिनं चाकूनं जावेदच्या छातीवर वार केले. त्यात तो जबर जखमी झाला. यानंतर रेणुका त्याला घेऊन रुग्णालयाच्या दिशेनं निघाली. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
प्रवाशाकडे सापडले १७ किंग कोब्रा, ६ माकडं, ५५ अजगर; एअरपोर्टवर कस्टमच्या कारवाईनं खळबळ
रेणुका कॉलेज ड्रॉपआऊट आहे. तिला ६ वर्षांची मुलगी आहे. मात्र बऱ्याच कालावधीपासून रेणुका जावेदसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. तिच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती. मात्र तिला पबला जाण्याचा, ऐशोआरामात जीवन जगण्याचा छंद होता. त्यासाठी होणाऱ्या खर्चावरुन अनेकदा दोघांमध्ये वाद व्हायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here