लंडन: ब्रिटनमधील बर्मिंगहॅममध्ये चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या असून त्यात सात जण जखमी झाले आहेत. या घटनेत एक व्यक्ती ठार झाली असून दोन जण गंभीर असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. मात्र या हल्ला दशहतवादी संबंधित नसल्याचे शहराचे मुख्य अधीक्षक स्टीव्ह ग्रॅहम यांनी स्पष्ट केले आहे.

वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सांगितले की, बर्मिंगहॅममध्ये झालेल्या या हल्ल्यांमागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागात मध्यरात्री घडलेल्या या घटनांची माहिती मिळाल्यापासून त्याची माहिती घेऊन पोलिस या हल्ल्यांमागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘काय घडले याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे. आम्ही कोणत्याही या घटनामागील कारणांच्या शोध घेऊन निर्णयाप्रत येण्यास काही वेळ लागू शकेल, असे पोलिसांनी हल्ल्यानंतर स्पष्ट केले होते. सध्या पोलिसांनी शहरातील वर्दळीचे चौक, हर्स्ट स्ट्रीट, नाइटलाइफसाठी लोकप्रिय असलेले गे व्हिलेज आणि ब्रूमस्ग्रोव्ह स्ट्रीट येथील बंदोबस्त वाढवला आहे. आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या आहे. हल्ल्यातील काही जखमींना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले. हल्ल्ल्यानंतर रहिवाशांना या परिसरात न येण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. हल्ला झाला तो रस्ता करोनाच्या प्रादुर्भावानंतर सुरक्षिततेच्या उपाय म्हणून बंद करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात ही घटना घडली त्यापूर्वी म्हणजे शनिवारी रात्री साडेबारा वाजता या भागातील रेस्टाँरंटच्या बाहेरील टेबल्सवर मोठ्या संख्येने लोक जेवायला बसलेले होते.

वाचा:

वाचा:

वाचा: ही घटना घडली त्यावेळी तिथे असलेल्या एका महिलेने दोन गटांमध्ये बाचबाची झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या वंशद्वेषी शेरेबाजी झाल्याने वातावरण तापल्याचे त्या महिलेने सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here