बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे राज्यभर ओळखले जातात. नागरिकांना आपल्या समस्या व काम थेट अजितदादांमार्फत करून घ्यायचे असल्यास त्याला कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसते. नागरिक त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम ते जागच्या जागीच मार्गी लावतात. याचाच प्रत्यय आज बारामतीकरांना आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत त्यांनी आज विविध सांत्वनपर भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान शहरातील आमराई परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी शहरातील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या दादांनी मार्गी लावल्या. यावेळी एका मागासवर्गीय कुटुंबातील रिक्षाचालकाच्या महाविद्यालयीन मुलीच्या शैक्षणिक फी संदर्भात प्रतीक्षा या विद्यार्थिनीने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निवेदन सादर केले. दादांनी ते निवेदन आस्थेने वाचत तात्काळ सदर विद्यार्थिनीची संपूर्ण फी माफ करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

ठाकरेंची मोठी खेळी, भाजपचा काट्याने काटा काढणार, कपिल पाटलांना खिंडीत गाठण्यासाठी कथोरेंना ऑफर?
अजितदादांच्या याच कामाच्या पद्धतीमुळे बारामतीकर त्यांना नेहमीच उचलून धरतात. म्हणूनच त्यांना वेळोवेळी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लाखोच्या मतांनी बारामतीकर निवडून देत असतात. अजितदादांकडे कोणताही बारामतीकर नागरिक कोणत्याही मध्यस्थशिवाय सहज जाऊ शकतो व आपल्या समस्या-कामे सांगू शकतो. अजितदादाही त्यांची आस्तेवायिक विचारपूस करत त्यांची कामे जागच्या जागी मार्गी लावतात. याचा प्रत्यय नेहमीप्रमाणे आजही बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.

राज ठाकरे आणि माझी परिस्थिती सारखीच, बिचुकले थाटात म्हणाले, मनसे प्रवेशाबद्दलही मोठं वक्तव्य
दरम्यान, भाजपला सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज दुसऱ्यांदा बारामतीला आले होते. गेल्या आठवड्यात समस्त बारामतीकरांनी अजित पवार यांचं दणक्यात स्वागत केलं होतं. या स्वागताने अजितदादा भारावून गेले होते. बारामतीकरांच्या याच प्रेमाने मला कामाला हुरूप येतो. लाखा-लाखांनी लोक निवडून देतात, त्यामुळे मी काम करायला वेळेचं बंधन ठेवत नाही, असं दादा म्हणाले होते.

मी आजारी होतो पण त्यातूनही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला | अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here