आरोपीची ओळख पटली आहे. नौफल असं त्याचं नाव (वय २५ ) आहे. आरोपीने आधी वृद्ध महिलेला रुग्णालयात सोडलं. त्यानंतर १९ वर्षीय करोना रुग्णाला कोविड -१९ केंद्रात न घेता अरानमुला विमानतळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
पीडित मुलगी पंडलममध्ये तिच्या नातेवाईकांकडे क्वारंटाइन होती आणि ती शनिवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले जात होते. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीला रविवारी अटक करण्यात आली आणि त्याच्याविरूद्ध लैंगिक छळ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. रुग्णवाहिकेची सेवा त्वरित बंद करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. आरोपीला १०८ रुग्णवाहिका विभागातून काढून टाकण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलीय. या प्रकरणी तपास वेगाने करावा आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी केरळच्या डीजीपींना पत्र लिहिलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times