ठाणे: मुंब्रा बायपास रोडलगत असलेल्या नाल्यात केमिकलचा टँकर उलटला. हा अपघात आज पहाटे ५ वाजता घडला. या अपघातामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु असून टँकरमधून केमिकलचा उग्र वास आणि धूर येत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

सल्फ्युरिक ॲसिडचा हा टँकर बोईसरवरुन जालन्याला मुंब्रा बायपास मार्गे जात होता. यावेळी चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर मुंब्रा बायपास रोडलगत चर्नी पाडा येथील नाल्यात अचानक उलटला.

पवईत एअर हॉस्टेसचा जीव घेणाऱ्या सफाई कामगाराने आयुष्य संपवलं, पोलीस कोठडीतच टोकाचं पाऊल
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, मुंब्रा पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून या अपघातामध्ये चालक ब्रिजेश सरोळ (४५ वर्ष, रा. चेंबूर, मुंबई) याच्या डाव्या हाताला, कमरेला, चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

पतीच्या इंजेक्शनसाठी पैसे कमी पडले, महिलेने हॉस्पिटलबाहेर भीक मागितली, नवऱ्याचे प्राण वाचवले
तर, अपघातामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असून टँकरमधून केमिकलचा धूर आणि उग्र वास येत आहे. केमिकल एक्सपर्ट यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने हा टँकर बाजूला करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

आमदार अभिमन्यू पवारांच्या माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्तांना स्वत: च्या गाडीतून रुग्णालयात नेलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here