पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरालगत असणाऱ्या देहूरोड परिसरात संताप वाढवणारी घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांचे चार पाय अन तोंड बांधून, त्यांना पोत्यात डांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात ही क्रूरता कैद झाली आहे. त्यामुळे प्राणीप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी महापौरांचा १५ हजारांचा बूट कुत्र्यांनी पळवला, पोलिसांची धावाधाव, संभाजीनगरमध्ये काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, देहूरोड परिसरात ३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या एका सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्याला हातपाय बांधून पोत्यात बांधल्याचा.प्रकार घडला आहे. पण यातील तीन कुत्र्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देहूरोडच्या संकल्प नगरी सोसायटीत हा प्रकार घडल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला आहे. या सोसायटी आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा नेहमीच वावर असतो. यामुळं येथील रहिवासी त्रस्त झाले होते. या कुत्र्यांपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी हा क्रूर प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे.

मंचर रहिवाशांसाठी महत्वाची बातमी; आता कुत्रे पाळण्यासाठी काढावा लागणार परवाना

३ सप्टेंबरच्या सायंकाळी तीन कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून, त्यांना पोत्यात डांबण्यात आलं आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर याबाबत.प्राणीमात्रांना संमजल आहे. प्राणीमित्रानी त्यांनी तातडीनं संकल्प नगरीत धाव घेतली, पण तो पर्यंत कुत्र्यांना इतरत्र हलविण्यात आले होते. मग प्राणी मित्रांनी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली अन दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्या कुत्र्यांचा शोध लागलेला नाही. अधिक तपास देहूरोड पोलिस करत आहेत.

भटक्या कुत्र्यांचा अन्नदाता; कुत्र्यांचं जेवण बनवण्यासाठी ठेवली स्वयंपाकीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here