धुळे : मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा आयशर भरधाव वेगात असल्याने अचानक उलटला. त्याखाली दुचाकी सापडल्याने महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील सरवड शिवारात सकाळच्या सुमारास घडली. डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे (वय ३५) असं मयत महिला डॉक्टरचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच सोनगीर ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दंतवैद्य म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे या शुक्रवारी सकाळी एमएच १८ बीव्ही ०७५१ क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्याहून सोनगीरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी धुळे तालुक्यातील सरवड फाट्याजवळ पाठीमागून येणारा आरजे ११ जीबी ८१६० क्रमांकाचा भाजीपाल्याने भरलेला आयशर उलटला. त्याखाली डॉ. आदिती यांची दुचाकी सापडली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

मुंब्रा बायपासवर टँकर नाल्यात उलटला, केमिकलचा उग्र वास-धूर, वाहतूक धीम्या गतीने
दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताचे वृत्त कळताच सरवड आणि सोनगीर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड आणि कर्मचारी दाखल झाले. महिला डॉक्टरला ट्रकच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेने सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून आदिती यांना मयत घोषित केले.

महामार्गावर ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या मदतीने आयशर बाजूला करण्यात आला. डॉ. आदिती जोगळेकर यांचे पती डॉ. मनोज सोनवणे हे देखील डेंटिस्ट आहेत. पाच वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. डॉक्टर दाम्पत्य धुळ्यातील जीटीपी चौकाजवळ वास्तव्यास आहे.

Manoj Jarange: मुंबईत गहन चर्चा, बंद लिफाफा घेऊन खोतकर जालन्याकडे रवाना, मनोज जरांगे-पाटील उपोषण सोडणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here