सुरक्षित गुंतवणूक अन् कर लाभ
पीपीएफ योजनेतील गुंतवणूक हा दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणूक असून प्रचंड व्याज दरासह सरकार तुमच्या ठेवींवर सुरक्षिततेची हमी देखील देते आणि यामध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारा परतावा हा पूर्णपणे करमुक्त असतो. तसेच चक्रवाढ व्याजाचा लाभही या योजनेत उपलब्ध आहे. यासह तुम्ही आयकराच्या कलम ८०सी अंतर्गत PPF मधील गुंतवणुकीवर कर सूट मिळवू शकता.
PPF गुंतवणुकीबद्दल सविस्तर वाचा
गुंतवणूकदार पीपीएफमध्ये फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरुवात करून एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. तसेच या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे, परंतु जर तुम्हाला मॅच्युरिटीनंतरही गुंतवणूक चालू ठेवायची असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही PPF खात्याचा कालावधी पाच वर्षासाठी वाढवू शकतात. मात्र, यासाठी मॅच्युरिटी पूर्ण होण्याच्या एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल.
पाच हजार रुपये/महिना गुंतवणुकीवर इतका नफा
जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा फक्त पाच हजार रुपये वाचवले तर वार्षिक ४२ लाख रुपयांचा निधी जमा होईल. तर या योजनेतील गुंतवणुकीवर ७.१% दराने व्याज दिले जाते. दरमहा पाच हजार रुपये जमा केल्यावर एका वर्षात PPF खात्यात ६० हजार रुपये जमा होतील आणि १५ वर्षांत जमा केलेली एकूण रक्कम ९ लाख रुपये असेल. अशा स्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर निश्चित केलेल्या व्याजदरानुसार ७ लाख २७ हजार २८४ रुपये व्याज मिळेल, म्हणजेच १५ वर्षात तुम्ही जमा केलेला निधी वाढून १६ लाख २७ हजार २८४ रुपये होईल.
दरम्यान जर तुम्ही PPF मधील गुंतवणूक मॅच्युरिटीनंतर ५-५ वर्ष म्हणजे एकूण १० वर्षांसाठी वाढवली तर एकूण २५ वर्षांनी तुमच्याद्वारे जमा केलेल्या रकमेवरील व्याजासह एकूण निधी सुमारे ४२ लाख रुपये तुम्हाला मिळतील. २५ वर्षांच्या या कालावधीत तुम्हाला मिळणारे व्याज उत्पन्न २६ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
PPF योजनेवर कर्जाची सुविधा
पीपीएफ योजनेत तुम्हाला एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. त्याच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या योजनेद्वारे एक वर्षाच्या मुदतीसह आपत्कालीन निधी काढणे देखील शक्य आहे, तरी गुंतवणूकदार ५०% पेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. यासाठी घालण्यात आलेल्या अटीनुसार गुंतवणुकीचा कालावधी ६ वर्षे पूर्ण झाला असला पाहिजे. तसेच तुम्ही टेन वर्षे गुंतवणूक केल्यानंतरच या अंतर्गत कर्ज घेऊ शकता.