मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात प्रत्येक दिवशी नवीन फेरबदल होत असताना येत्या काही दिवसात एक कंपनी स्टॉक मार्केटमधून डीलिस्ट होणार आहे. श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक लिमिटेडला स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE कडून डीलिस्टिंगसाठी मंजुरी मिळाली आहे. ट्रांसवर्ल्ड होल्डिंग्सने २१ मे रोजी भारतीय उपकंपनीचे शेअर्स बाजारातून हटविण्याची घोषणा केली, त्यानंतर या प्रस्तावाला संचालक मंडळाने २४ मे रोजी आणि श्रेयस शिपिंगच्या भागधारकांनी ३ जुलै रोजी विशेष ठरावाद्वारे मंजुरी दिली.

शेअर बाजारात पसरला गोडवा! ऐन सणासुदीत साखर महाग, Sugar स्टॉक्सनी घेतली उंच उडी
शेअर्स खरेदी करणार
डीलिस्टिंगच्या नियमांतर्गत शेअर्स बायबॅकची किमान किंमत २९२ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे, तरी मूळ कंपनीने प्रीमियम आणि सूचक किंमत म्हणून प्रति शेअर ३३८ रुपये देऊ केले आहेत. ट्रान्सवर्ल्ड होल्डिंग्जने २१ मे रोजी त्यांच्या भारतीय उपकंपनी – श्रेयस शिपिंगचे इक्विटी शेअर्स स्वेच्छेने डीलिस्ट करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. प्रस्तावित डीलिस्टिंग आता किमान निविदा अटी आणि इतर नियामक मंजूरींच्या अधीन असून कंपनीने सांगितले की, प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यास डीलिस्टिंग नियमांनुसार रिव्हर्स बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे SSL चे इक्विटी शेअर्स निश्चित किंमतीला खरेदी केले जातील.

10 हजारांच्या गुंतवणुकीचे केले करोड, गुंतवणूकदारांची भरली तिजोरी, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
नोव्हावन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड डीलिस्टिंग प्रक्रियेवर व्यवस्थापक म्हणून काम करत असून जेएसए कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहे. लक्षात घ्या की सध्‍या ट्रान्सवर्ल्‍ड होल्‍डिंग्ज लिमिटेड आणि त्‍याच्‍या सहयोगींकडे श्रेयस शिपिंग आणि लॉजिस्टिकच्‍या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलपैकी ७०.४४ टक्के हिस्सा आहे.

TATA म्हणजे नो घाटा! छुपा रुस्तम स्टॉकचा भाव नव्या उंचीवर, आता डाव लावल्यास होऊ शकतो जबरदस्त नफा
श्रेयस शिपिंग शेअर्सची वाटचाल
श्रेयस शिपिंगने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत गेल्या सहा महिन्यांत ४२ टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर एका महिन्यात स्टॉकचा परतावा ८ टक्के असून पाच दिवसांत १० टक्के, तर यावर्षी आतापर्यंत २३ टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी डीलिस्टची बातमी दरम्यान आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शुक्रवारी श्रेयस शिपिंग आणि लॉजिस्टिक्सच्या शेअर्समध्ये पडझड झाली. तर व्यवहार दरम्यान शेअर १.१५% पेक्षा कमी होऊन ३७१.७० रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here