वाचा:
‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती जास्त वाटते’ अशी वक्तव्य केल्यानं कंगना राणावत हिच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना, मनसे व काँग्रेसनं तिला कठोर शब्दांत सुनावलं आहे. शिवसेना अधिक आक्रमक झाली असून तिनं कंगनाचं थोबाड फोडण्याची भाषा केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिला चंबूगबाळं आवरून आपल्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राऊत व कंगनामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. ‘माझ्या नादाला लागू नकोस. मी याआधीही अनेक वादळांचा सामना केलाय,’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. त्यानंतरही कंगनाची वक्तव्ये सुरूच आहेत. तिनं लगेचच महिलेच्या अपमानाचा मुद्दा पुढं आणला आहे. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, माझा जबडा तोडून दाखवा, असं आव्हान तिनं पुन्हा एकदा दिलंय.
वाचा:
भाजपचे आमदार यांनी कंगनाचं ताजं ट्वीट रीट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे. ‘शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना या महिलेनं उघड आव्हान दिलंय. जिनं बॉलिवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नव बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत,’ असा टोलाही भातखळकर यांनी हाणला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times