नांदेड: मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषण मागे घेण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातं आहे. त्यांच्या या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील ११ मराठा बांधवांनी उपोषण सुरु केले आहे. अर्धापूर, हदगाव, कंधार, नायगाव या तालुक्यात मराठा बांधवाचे उपोषण सुरु असून ७ ते ८ जणांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान यातील एका उपोषणकर्त्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन द्वारे संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

दत्ता पाटील हडसनिकर ( हडसनी ता.हदगाव), सतिश पाटील हिप्परगेकर, गजानन पाटील हिप्परगेकर ( ता.नायगाव), हनुमंत बालाजी ढगे (वजीरगाव ता.नायगाव), संभाजी पाटील गोंधळे, नामदेव पाटील डाकोरे (पेठवडज ता.कंधार), आकाश पाटील कल्याणकर ( ता.कंधार), जयवंत कदम, स्वप्नील कदम, संतोष कदम, आकाश शिंदे (धामदरी ता.अर्धापूर) इत्यादी उपोषणकर्त्यांचे उपोषण सुरु आहे. दत्ता पाटील हडसणीकर यांच्यासह सात ते आठ जणाची प्रकृती खालावली आहे. उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून विनंती देखील जातं आहे. दरम्यान शनिवारी लोहा तालुक्यातील डेरला येथील संपूर्ण ग्रामस्थ गावात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती आहे. जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

Manoj Jarange: मुंबईत गहन चर्चा, बंद लिफाफा घेऊन खोतकर जालन्याकडे रवाना, मनोज जरांगे-पाटील उपोषण सोडणार?

मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवर साधला संवाद

मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हदगाव तालुक्यातील हडसनी येथील दत्ता पाटील हडसनीकर यांनी देखील उपोषण सुरु केले आहे. मागील सात दिवसा पासून त्यांचे उपोषण सुरु आहे. त्यांची प्रकृती खालवल्याने दत्ता पाटील यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या माद्यमातून हडसनीकर यांना फोन द्वारे संवाद साधला.आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बैठका देखील सुरु आहे. तेव्हा उपोषण मागे घ्यावे विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडसनीकर यांना केली. मात्र हडसनीकर यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान दत्ता पाटील हडसनीकर यांनी यापूर्वी देखील जुलै महिन्यात मराठा आरक्षणच्या मागणीसाठी उपोषण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here