राजू भीमराव नागरे (वय 29 रा. कादरबाद) असे परीक्षार्थींना उत्तरे पुरवताना अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मंगळवारी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे हे पथकासह दुचाकी चोर शोधत असताना केंद्रासमोर चार तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले व विचारपूस केली असता आरोपी त्या ठिकाणाहून पळाले. या धावपळीत राजू नागरे हा पोलिसांच्या हाती लागला यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये मास्टर कार्ड व दोन मोबाईल आढळून आले. या मोबाईल मधील टेलिग्रामवर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे 34 प्रश्नांचे छायाचित्र आढळून आले.
दंगलीचा गुन्हा दाखल झाला अन् राजूच पीएसआय संधी हुकलं…..
अटक करण्यात आलेल्या राजू नागरे याचे बीकॉम पर्यंत शिक्षण झाले असून त्याने काही दिवसांपूर्वी फौजदार पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केले. मात्र मैदानी चाचणी होणार त्यापूर्वी त्याच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला त्यामुळे त्याची संधी हुकली. यानंतर तो स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षार्थींना थेट केंद्रात उत्तरे पुरवण्याच्या टोळीमध्ये सक्रिय झाला. थेट दहा लाख रुपयांमध्ये उत्तरे देण्याचा दावा राजू करू लागला.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको एमआयडीसी पोलिसांनी राजू नागरे याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू केली. मात्र, राजू नागरे यांच्या सुटकेसाठी थेट मंत्रालयातूनच फोन येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे या घोटाळ्याचे कनेक्शन थेट मंत्रालयात असल्याचं बोललं जात आहे.