मुंबई: शास्त्रज्ञ तसेच, विज्ञानात रुची असलेल्या अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो की पृथ्वीशिवाय दुसरा कोणता ग्रह आहे का जिथे जीवन आहे? किंवा पृथ्वीसारखा दुसरा कुठला ग्रह आहे का? आपल्या सूर्यमालेत ‘पृथ्वी’ सारखा एक ग्रह असल्याचा दावा दोन जपानी शास्त्रज्ञांनी केला आहे. या शास्त्रज्ञांना याचे पुरावेही मिळाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यमालेतील नेपच्यून ग्रहाजवळ स्थित क्युपर बेल्टजवळ आपल्या पृथ्वीसारखा एक ग्रह आहे. क्युपर बेल्ट देखील सूर्याभोवती फिरतो. गेल्या दशकात अशा अनेक सिद्धांतांवर अभ्यास करण्यात आला आहे. अनेक संशोधकांनी सूर्यमालेच्या बाहेर पृथ्वीसारखा ग्रह आहे का यावर दावा केला आहे. या प्रकारच्या ग्रहाला ‘प्लॅनेट नाईन’ असे नावही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सौरमालेतील ९व्या ग्रहाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या ग्रहावर इतकं सोनं आहे की पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होईल, आणण्यासाठी नासाने मोहीम आखली
जपानी शास्त्रज्ञांचा दावा

जपानच्या किंडाई युनिव्हर्सिटीच्या (Kindai University) पॅट्रीक सोफिया लायकाव्का (Patryk Sofia Lykawka)आणि नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीच्या (National Astronomical Observatory) ताकाशी इतो (Takashi Ito) यांनी हा दावा केला आहे. पृथ्वीसारखा दुसरा ग्रह आहे, असा आमचा विश्वास आहे, असं हे शास्त्रज्ञ म्हणतात. यासोबतच शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की, प्रायमोर्डियल प्लेनेट (Primordial Planet) ची बॉडी क्युपर बेल्ट किंवा केबीपीमध्ये सहज टिकून राहू शकते. यापूर्वी सूर्यमालेत अशा अनेक बॉडीज होत्या. दोन्ही संशोधकांचा असा दावा आहे की जर प्लॅनेट नाईन असेल तर ते केबीपीमध्ये असू शकते.

दोघांचा संशोधन अभ्यास द अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. लायकाव्का आणि इतो यांनी असेही सांगितले की जर हा पृथ्वीसारखा ग्रह अस्तित्वात असेल तर तो पृथ्वीपेक्षा १.५ ते ३ पट मोठा असेल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हर नव्या गुपितांच्या शोधात

लायकाव्का आणि इतो यांनी दावा केला आहे की, बाह्य सौर मंडळामध्ये पृथ्वीसारखे अनेक ग्रह आणि अनेक ट्रान्स-नेपच्युनियन वस्तू आहेत. पृथ्वीसारखा ग्रह ज्याच्या अस्तित्वाचा दावा केला जात आहे तो सूर्यापासून २००-५०० खगोलीय एकक (Astronomical Units) दूर आहे. पृथ्वीपासून प्लूटोचे अंतर २९ AU आहे. यावरून हा ग्रह पृथ्वीपासून किती अंतरावर आहे याचा अंदाज लावता येतो.

Chanrdayaan 3: चंद्रावरील प्लाझ्मा आणि नैसर्गिक हादऱ्यांची नोंद, ‘रंभा’ आणि ‘इल्सा’ची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here