वॉशिंग्टन: अमेरिकेतील आर्कान्सा येथे असलेल्या क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कमध्ये, एका ७ वर्षांच्या मुलीला असं काही सापडलं ज्याचं स्वप्न अनेकजण बघतात. तिच्या वाढदिवसानिमित्त ती इथे फिरायला आली होती. तेव्हा तिला २.९५ कॅरेटचा हिरा सापडला. आर्कान्सा स्टेट पार्क्सच्या म्हणण्यानुसार, पॅरागोल्ड रहिवासी अस्पेन ब्राउनला पार्कमध्ये तिच्या कुटुंबासह वाढदिवस साजरा करताना हा हिरा सापडला. पार्कने इंस्टाग्रामवर मुलीच्या या शोधाबद्दल सांगितले आहे. “पॅरागोल्ड येथे राहणाऱ्या ७ वर्षांच्या अस्पेन ब्राउनला १ सप्टेंबर रोजी मर्फिस्बोरो येथील डायमंड्स स्टेट पार्कच्या क्रेटरवर आली होती आणि तिला येथे २.९५-कॅरेट अस्पेन ब्राउन हिरा सापडला, जो घेऊन ती घरी निघून गेली”, असे आर्कान्सा स्टेट पार्क्सने लिहिले. या वर्षी उद्यानात आलेल्या व्यक्तीला सापडलेला हा दुसरा मोठा हिरा आहे. यापूर्वी मार्चमध्ये ३.२९ कॅरेटचा तपकिरी हिरा सापडला होता.पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रियाही पोस्ट दोनच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. या पोस्टला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. लोकांनी कमेंट करून याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, ‘व्वा, फार सुंदर’. तर कोणी लिहिलं की, ‘अॅस्पेनचे अभिनंदन, हा एक उत्तम शोध आहे.’ तर एकाने लिहिलं की, ‘मला देखील एक दिवस येथे जायचं आहे, मी याची वाट पाहू शकत नाही.’ तर एकाने लिहिले की, ‘वाह.’इन्स्टाग्रामवर पोस्टसोबत हिऱ्याचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो खूपच अप्रतिम दिसत आहे. हा हिरा लांबून प्लास्टिकसारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो हिरा आहे. या उद्यानाबद्दल बोलायचे झाले तर दूरदूरवरून लोक येथे हिरे शोधायला येतात. पण, प्रत्यक्षात हिरे ज्यांना सापडले असे लोक फार कमी लोक आहेत. कधी लोकांना लहान आकाराचे हिरे मिळतात, कधी मोठ्या आकाराचे हिरे मिळतात, तर कधी-कधी खूप प्रयत्न करुनही त्यांना हिरे मिळत नाहीत.
Home Maharashtra वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्कमध्ये गेली, ७ वर्षांच्या मुलीला असं काही सापडलं की...