कुठल्या भागांना पावसाचा इशारा…
मुंबई आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी याच तारखांना मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळले. आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातमध्ये आज मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. पण उद्यापासून मात्र पाऊस ओसरले अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Forecast : राज्यात महिनाभर मुसळधार पाऊस, कुठे येलो आणि ऑरेंज अलर्ट? वाचा सविस्तर वेदर रिपोर्ट
दरम्यान, विदर्भाला आज हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात ९ तारखेला पावसाचा जोर पहायला मिळेल पण त्यानंतर पुढचे २ दिवस पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज आहे. पण यानंतर विदर्भातही पाऊस सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
महिनाभर राज्यात पाऊस बरसेल…
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ आठवड्यांच्या अंदाजानुसार, ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग, विदर्भाचा काही भाग येथे पाऊस पडू शकतो. २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस तरी पावसामुळे दिलासा मिळेल का, पावसाची किती तूट भरून निघेल आणि त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.